पुणे : पुण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीमध्ये आघाडीची शक्यता जवळ जवळ मावळली आहे.
जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्यच्या निर्णयावर आले आहेत. त्याबाबतची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. पुण्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला ६० जागा देऊ केल्या होत्या. मात्र त्यामध्ये काँग्रेसला हव्या त्या जागा देण्यास राष्ट्रवादीचा विरोध होता.
या पार्श्वभूमिवर काँग्रेसच्या नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली. त्यात राष्ट्रवादी स्वःतच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.