कोल्हापुरात चार महिन्यात प्रवासी विमानसेवा?

कोल्हापुरात येत्या चार महिन्यात विमानतळावर प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Updated: Aug 19, 2016, 10:40 AM IST
कोल्हापुरात चार महिन्यात प्रवासी विमानसेवा? title=

कोल्हापूर : कोल्हापुरात येत्या चार महिन्यात विमानतळावर प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांना काही विशेष सुविधाही देण्यात येतील का यावर सध्या विचार सुरू आहे. 

सध्या विमानतळाकडे कर्मशिअल लायन्सस नाही, त्यासाठी दिल्लीत महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे, त्यावर लवकरच तोडगा काढणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.