पनवेल ते चिपळूण 50 रुपयांमध्ये, गणेशोत्सवात रेल्वेची खास सुविधा

गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केल्या आहेत. 

Updated: Aug 19, 2016, 08:52 AM IST
पनवेल ते चिपळूण 50 रुपयांमध्ये, गणेशोत्सवात रेल्वेची खास सुविधा title=

मुंबई : गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान पनवेल ते चिपळूण जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. गणेशोत्सव काळात चिपळूण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, याचा ताणही प्रशासनावर पडतो. हीच बाब लक्षात घेत या गाडीच्या 36 फे-या चालवल्या जाणार आहेत. 

विशेष म्हणजे पनवेल ते चिपळूण हा प्रवास फक्त 50 रुपयात करता येणार आहे. गेल्यावर्षीचा प्रतिसाद पाहूनच मध्य रेल्वेनं यावर्षीही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.