पुण्यात कॉलेज तरुणीवर बलात्कार, तिघांना अटक

शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर तिच्याच महाविद्यालयात शिकत असलेल्या दोघा विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Oct 21, 2016, 06:13 PM IST
पुण्यात कॉलेज तरुणीवर बलात्कार, तिघांना अटक title=

पुणे : शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीवर तिच्याच महाविद्यालयात शिकत असलेल्या दोघा विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातल्या वाघोली परिसरात असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात पीडीत तरुणी तसच आरोपी विद्यार्थी शिक्षण घेतायत, कॉलेज जवळच्या परिसरात असलेल्या आरोपीच्या रूमवर हा प्रकार घडलाय. 

या प्रकरणी करण घुगे आणि महेश कोरडे या दोघा विरोधात बलात्काराचा तर अविनाश शेळके विरोधात मोबाईल द्वारे मेसेज करून त्रास दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तिघाही आरोपीना लोणीकंद पोलिसांनी अटक केलीय.