मुंबई : राज्यात आता हळूहळू थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात थंडी जाणवू लागली आहे. मुंबईत पारा 20 अंशापर्यंत खाली आलाय.
नाशिक आणि पु्ण्यामध्ये थंडीचं दणक्यात आगमन झालेले दिसत आहे.. नाशिक आणि निफाडमध्ये पारा 11 अंशांपर्यंत गेलाय. तर पुण्यातलीही थंडी वाढली आहे. पुण्यात पारा 12 अंशांपर्यंत खाली गेलाय.
सध्याच्या हवामानात कोणताही बदल झाला नाही तर पुढच्या आठवड्यात पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत अधिक वाढ होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.