महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरात पारा 8 पॉईंट 6 अंशांवर आला आहे. महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक, लिंगमळा परिसरात आत्तापर्यंत सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं आहे.
महाबळेश्वरसह पाचगणी, वाई, सातारा, कराड भागातही थंडीचा कडाका वाढलाय. यापुढेही थंडीत अशीच वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.