नारळ पाण्यावर होतेय शेती

नारळाचा किती वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करु शकतो याचं एक उदाहरण समोर आलंय. नेमकं काय केलं जातंय यावर एक स्पेशल रिपोर्ट.

Updated: Dec 6, 2014, 06:54 AM IST
 नारळ पाण्यावर होतेय शेती title=

नाशिक : नारळाचा किती वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करु शकतो याचं एक उदाहरण समोर आलंय. नेमकं काय केलं जातंय यावर एक स्पेशल रिपोर्ट.

मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर नारळ फोडण्याची प्रथा असते. मात्र त्यातलं पाणी सहसा वायाच जातं. याच वाया जाणाऱ्या नारळ पाण्याचा उपयोग आता शेतीसाठी करण्यात येतोय.

नाशिकमधल्या सप्तश्रृंगी देवस्थानात हा अनोखा प्रयोग राबवला जात आहे. फोडलेल्या नारळातलं पाणी वाया जाऊन त्याची दूर्गंधी पसरत होती. त्यामुळे नव्यानं रुजू झालेले व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी या नारळ पाण्याचा उपयोग करण्याचं ठरवलं. त्यांनी वाया जाणारं पाणी एका टाकीत साठवण्यास सुरुवात केली. आता हे पाणी शेतीसाठी उपयोगी ठरु लागलंय.

डाळिंब आणि द्राक्ष बागायतदार हे नारळ पाणी २५१ रुपयांना १० लिटर प्रमाणं विकत घेऊ लागलेत. शेतात औषध म्हणूनही त्याचा उपयोग केला जातोय. त्यामुळे शेतक-यांचं उत्पादनही वाढलंय. सप्तश्रृंगी देवस्थान राबवत असलेल्या या प्रयोगाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.