धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार जयकुमार रावल यांना वाचवण्यासाठी पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप धुळे काँग्रेस अध्यक्ष श्याम सनेर यांनी केलाय.
जयकुमार रावल यांच्यावर सहकारी बँकेत गैरव्यावहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआय़टीकडून चौकशी सुरु आहे. ही चौकशी अंतिम टप्प्यात आलीय. मात्र आमदार रावल यांना वाचवण्यासाठी सीआयडी चौकशीचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप सनेर यांनी केलाय.
बँक घोटाळा चौकशी प्रकणी अनेक पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आलीय. दरम्यान सनेर यांचे आरोप बिनबुडाचे असून वेळ आल्यावर त्यांच्या आरोपांना उत्तर देईन अशी भूमिका आमदार रावल यांनी घेतलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.