धुळे : जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उभी फूट पडल्याचं शुक्रवारी दिसून आले. धुळे जिल्ह्यातल्या काँग्रेसमधल्या अल्पसंख्याक समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांविरोधातच आंदोलन केले.
पक्षाशी एकनिष्ठ असूनही सतत आपल्याला डावलण्यात येतं असा आरोप, जिल्ह्यातल्या अल्पसंख्याक काँग्रेस सेलचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. निर्णय प्रक्रियेत आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. यामुळे धुळे जिल्हा काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं दिसून आले.
त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी जिल्ह्यात काँग्रेसनं नोटाबंदी विरोधात केलेल्या आंदोलनात अल्पसंख्याक सेल सहभागी झाला नाही. तर आज धुळे काँग्रेस अल्पसंख्यांक सेल नोटाबंदी विरोधात स्वतंत्र आंदोलन करणार आहे.