नवी मुंबई : सफाई कर्मचाऱ्यांच्या संप सुरुच असून शहरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याच्या गाड्या ओतून ठेवल्या गेल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. दिवाळीच्या तोंडावर बेमुदत संप सुरू आहे. तब्बल साडेपाच हजार सफाई कर्मचारी संपावर गेले आहेत. 'समान काम, समान वेतन' या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.
संपामुळे शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. आधीच शहरात डेंग्यू आणि चिकन गुणीयाच्या रुग्णांतमध्ये वाढ झालेली असताना आता साठलेल्या कचऱ्यामुळे डासांच्या प्रमात वाढ झालेय. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय.