धक्कादायक पण सत्य : सावित्रीच्या लेकींचे सर्रास बालविवाह सुरूच

सावित्री फुलेंची आज जयंती.... पण आजही सावित्रीच्या अनेक लेकींची दयनिय अवस्था आहे. 

Updated: Jan 3, 2017, 01:52 PM IST
धक्कादायक पण सत्य : सावित्रीच्या लेकींचे सर्रास बालविवाह सुरूच title=

विशाल करोळे, बीड : सावित्री फुलेंची आज जयंती.... पण आजही सावित्रीच्या अनेक लेकींची दयनिय अवस्था आहे. 

सर्रास होतायत बालविवाह

वय अवघं चौदा-पंधरा वर्षांचं.... स्त्री पुरुष संबंध म्हणजे काय, हे 'ती'ला माहीतही नव्हतं... एका रात्रीत तिचं लग्न ठरलं... दुसऱ्याच दिवशी लग्न लागलं सुद्धा... आणि पाहता पाहता सोळाव्या वर्षी तिच्या कडेवर मुलंही आलं... बीडमधल्या एका छकुलीची ही गोष्ट... मराठवाड्यात अशा अनेक कळ्या कुस्करल्या गेल्यात. 

'लेक वाचवा'

या छकुलीसारखं सायराचंही लग्न ठरलं... पण, प्रशासनानं योग्यवेळी मध्यस्थी केली आणि सायरा वाचली... प्रत्येक मुलीचं नशीब सायराइतकं चांगलं नसतं... लहानपणीच त्यांची सर्रास लग्न लावली जातात... बीडच्या ग्रामीण भागात हे चित्र अजूनही कायम आहे. हे चित्र बदलण्याचा प्रयत्न आता केला जातोय... 'लेक लाडकी' अभियानाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षभरात 80 पेक्षा जास्त बालविवाह मोडलेत, अशी माहिती पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी दिलीय.  

मराठवाड्यातल्या या बालविवाहाच्या प्रश्नाला आता गांभीर्यानं घेतलं जातंय. औरंगाबादमध्ये नुकतीच यासंदर्भात बैठक झाली आणि पुढची रणनिती आखण्यात आल्याचं महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलंय. 

निरक्षरता, रुढी परंपरा, मानसिकता, गरिबी, पुरेशी जनजागृती नाही अशा अनेक कारणांमुळे निरागस मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय. पण, आता ही निराशाजनक परिस्थिती बदलायला स्वतः मुलींनीच पुढाकार घेतलाय. लेक लाडकी अभियानांतर्गत ज्या मुलींचे बालविवाह मोडले गेले, अशा मुलीच आता पुढे आल्यायत आणि