चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीत बंडखोरी, काँग्रेसमध्ये सर्वाधिक लागण

आगामी 19 तारखेला होऊ घातलेल्या चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीत 66 वॉर्डांसाठी सुमारे 800 उमेदवार आहेत. बंडखोरीच्या भीतीने अनेक पक्षांनी शेवटपर्यंत आपल्या याद्या जाहीर करणं टाळले तरीही बंडखोरी व्हायची ती झालीच.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 4, 2017, 10:10 PM IST
चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीत बंडखोरी, काँग्रेसमध्ये सर्वाधिक लागण title=

चंद्रपूर : आगामी 19 तारखेला होऊ घातलेल्या चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीत 66 वॉर्डांसाठी सुमारे 800 उमेदवार आहेत. बंडखोरीच्या भीतीने अनेक पक्षांनी शेवटपर्यंत आपल्या याद्या जाहीर करणं टाळले तरीही बंडखोरी व्हायची ती झालीच.

चंद्रपूर महापालिका निवडणूक येत्या 19 तारखेला होतेय. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपलीय. अर्ज भरण्याच्या अखरेच्या दिवशी काँग्रेसमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. शेवटपर्यंत यादी जाहीर करण्याचं पक्षानं टाळलं असलं, तरी अनेकांनी मूळ पक्षाशी फारकत घेऊन भाजपचा रस्ता धरलाय.

काँग्रेस, बसपा, रिपाई सगळ्याच पक्षातून अर्ज भरण्याच्या अखरेच्या दिवशी भाजपमध्ये इनकमिंग झाले आहे. सर्वात मोठा धक्का काँग्रेसला बसला आहे. नगरसेवक आणि सभागृह नेते रामू तिवारी यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केलाय. शिवाय काँग्रेसचे चंद्रपूरचे प्रभारी माजी खासदार नरेश पुगलीया यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 

दरम्यान, वादग्रस्त १२ नगरसेवकांना तिकीट नकोच अशी भूमिका मांडणारे माजी काँग्रेस खासदार नरेश पुगलीया यांनी शेवटी 6 जणांना तिकीटं देण्याचं मान्य केलं. पण रामू तिवारींचा कापलाच. शिवाय नव्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याचा निर्धार व्यक्त केलाय.

चंद्रपूर मनपाच्या रणसंग्रामात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि रिपाई या पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या काळात प्रचाराचा धडाका आणि आश्वासनांची मालिका यात कोण बाजी मारतो यावरच सर्वकाही अवलंबू आहे.