सोलापूर : हायकोर्टाची स्थगिती असतांनाही सोलापूर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची पुन्हा एकदा तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
गुडेवार यांच्या जागी म्हणजे सोलापूरच्या आयुक्तपदी शेखर गायकवाड असतील. तर गुडेवार यांची ग्रामविकास खात्यामध्ये बदली झाली आहे.
व्यापारी गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला गुडेवार यांनी विरोध केला होता. त्यामुळे भाजप नेत्यांच्या दबावामुळे बदली झाल्याचा आरोप होत आहे.
नाशिक जिल्हाधिकारी विलास पाटील यांचीही बदली
नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांचीही बदली करण्यात आली आहे. पाटील यांच्या जागी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
नाशिक शहरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे.विलास पाटील यांची फिल्मसिटीचे एम.डी म्हणून बदली करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.