आश्चर्य! पुण्यातलं अॅप्पल टेरेस गार्डन...

सफरचंदाचं झाड म्हटलं की आपल्याला आठवत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश मधलं सिमला मनाली… पण चक्क पुण्यात ही किमया घडलीय. 

Updated: Feb 6, 2015, 06:23 PM IST
आश्चर्य! पुण्यातलं अॅप्पल टेरेस गार्डन...  title=

पुणे : सफरचंदाचं झाड म्हटलं की आपल्याला आठवत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश मधलं सिमला मनाली… पण चक्क पुण्यात ही किमया घडलीय. 

गुलाबी सफरचंदाचे हे लगडलेले घोस काश्मीर किंवा सिमल्यामधले नव्हे तर चक्क पुण्यातले आहेत... पुण्यातल्या वाकड परिसरातल्या नंदकुमार धुमाळ यांच्या परसबागेत ही सफरचंदांची झाडं आहेत.

सध्या बहरताना दिसत असलेल्या बागांची सुरुवात अक्षरशः बाजारातून आणलेल्या एका सफरचंदापासून झाली. बारा वर्षांपूर्वी नंदकुमार धुमाळ यांनी घरी सफरचंद आणलं आणि त्याच्या बिया एका प्लॅस्टिकच्या पिशवीत लावून ठेवल्या... आता त्याचंच सुमारे १५ फूट उंचीचं झाड झालंय. आणि त्याला सफरचंदही लागलीत.

महाराष्ट्रातल्या उष्ण आणि दमट हवामानात धुमाळ यांनी सफरचंदाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग केल्यानं, त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकोर्ड, इंडिया बुक ऑफ रेकोर्ड, गोल्डन बुक ऑफ रेकोर्ड आणि फरीदाबादच्या युनिक वल्ड ऑफ रेकोर्डमध्ये झालीय. 

धुमाळ इथेच थांबले नाहीत तर त्यांनी काही वर्षांपूर्वी यातूनच दोन छोटी कलमं अभ्यासासाठी कृषी विद्यापीठात दिली आणि दोन छोटी कलमं घराच्या टेरेसवर लावली. दोन वर्षांपूर्वी या रोपांनाही फळांची लगड झाल्यानं याची नोंद गोव्याच्या 'फर्स्ट टेरेस गार्डन फॉर अॅप्पल'मध्ये झालीय.
  
विशेष म्हणजे धुमाळ हे नोकरी करुन हे सगळं करतात. केवळ बागेची आवड असल्यामूळ त्यांनी या झाडाची लागवड केलीय.…! पण त्यांच्या या छंदामुळे शिमला, जम्मू काश्मिरमध्ये आढळणारं सफरचंद थेट पुण्यातल्या परसबागेत मिळायला लागलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.