'लव्ह जिहाद'ला भुजबळांचे उत्तर... 'लव्ह सनातन'

देशात लव्ह जिहादवरुन जोरदार राजकारण केले जात आहे. लव्ह जिहादला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार उत्तर दिले आहे. हिंदू मर्दाने मुस्लीम तरुणीशी विवाह केला तर त्याला तुम्ही लव्ह सनातन, असे म्हणाल का?, असा टोला भाजपला भुजबळ यांनी हाणला.

Updated: Sep 24, 2014, 12:30 PM IST
'लव्ह जिहाद'ला भुजबळांचे उत्तर... 'लव्ह सनातन'  title=

मालेगाव : देशात लव्ह जिहादवरुन जोरदार राजकारण केले जात आहे. लव्ह जिहादला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार उत्तर दिले आहे. हिंदू मर्दाने मुस्लीम तरुणीशी विवाह केला तर त्याला तुम्ही लव्ह सनातन, असे म्हणाल का?, असा टोला भाजपला भुजबळ यांनी हाणला.

व्हाट्सअॅपवर अनेक मेसेज फिरत आहे. मुस्लीम तरुणांने हिंदू मुलीशी लग्न केले असेल. त्याला लव्ह जिहादचे रुप कशाला द्यायचे? हिंदू मर्दाने मुस्लीम तरुणीशी विवाह केले तर त्याला काय लव्ह सनातन म्हणार का? अनेक तरुण-तरुणी प्रेम विवाह करतात. त्यांचा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता अब्बास नकवी, यांच्या बायकोचे नाव सीमा, शहानाझ हुसेन यांच्या मिसेसचे नाव काय रेणू. हा लव्ह जिहाद आहे का? बीजेपीचे मोठ मोठे लिडर यांच्या मुलींनी, काही नातींनी दुसऱ्या धर्मातील मुलांशी लग्न केले आहे. काहींनी धर्माच्या नावाखाली लग्न केलं. त्याला काय लव्ह सनातन म्हणायचे का?, असा रोखठोक सवाल छगन भुजबळ यांनी जाहीर कार्यक्रमात विचारला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये प्रथम लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भाजपने हा मुद्दा लावून धरला होता. त्याला छगन भुजबळ यांनी जोरदार हरकत घेतली आहे. दरम्यान, या आधी हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नानंतर धर्म परिवर्तनसाठी दबाव टाकणाऱ्या लव्ह जिहादला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र विरोध दर्शवलाय. हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.  

लव्ह जिहाद'वरून संघाच्या वाढत्याविरोधानं राजकारणही तापू लागलं आहे. 'राजकीय फायद्यासाठी लव्ह जिहादच्या मुद्द्याला जाणून-बुजून आरएसएसकडून हवा दिली जातेय, असा आरोप समाजवादी पक्षानं केलाय. 

'लव्ह जिहाद'ला उत्तर देण्यासाठी आता शिवसेना रणांगणात उतरलीय. आता, 'लव्ह जिहाद'ला 'लव्ह त्रिशूळ'मधून उत्तर देण्याचा बेत शिवसेनेनं आखलाय. उत्तरप्रदेश 'शिवसेने'चे अध्यक्ष अनिल सिंग यांनी ही माहिती दिलीय. जिथे जिथे 'लव्ह जिहाद'च्या घटना उघडकीस येतील तिथं प्रत्यक्षरित्या 'लव्ह त्रिशूळ'चे कार्यकर्ते उपस्थित होतील. 

'लव्ह त्रिशूळ'ची सुरुवात बरेलीपासून करून संपूर्ण उत्तरप्रदेशात लागू करण्याचे प्रयत्न केले जातील. त्यामुळे, खोट्या नात्यात अडकणाऱ्या हिंदू मुलींची आणि तरुणी त्यामुळे बचावल्या जातील, असं अनिल सिंग यांनी म्हटलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.