मुंबई : पेण-रोहादरम्यान साडेचार तासांचा मेगाब्लॉक मध्ये रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द केल्यात. तर कोकणकन्या उशिराने धावणार आहे.
पेण आणि रोहापर्यंतचा मार्ग दुपदरी करण्यासाठी मध्य रेल्वे उद्या शुक्रवार ९ जानेवारी रोजी सकाळी ११.५० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे कोकण मार्गावरून जाणार्या काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आज आणि उद्या १० जानेवारीला कोकणकन्या उशिरा सुटणार आहे.
कोकण मार्गावरील पेण आणि रोहा स्थानकातील दुपदरी करण्यात येत आहे. त्यामुळे कोकण मार्गावरून जाणार्या काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सकाळी ११.५० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत पेण, कासू, नागोठणे, रोहा सेक्शनमध्ये अभियांत्रिकी काम करण्यासाठी मध्य रेल्वेने हा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.
- ट्रेन क्र. १०१११ : छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव धावणार्या कोकणकन्या एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला असून ती ९ जानेवारीस रात्री ११.०५ वाजता सुटण्याऐवजी रात्री १२.२० वाजता (१० जानेवारी) सुटणार असून ४५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
- ट्रेन क्र. १०१०४ : मडगाव-छत्रपती शिवाजी टर्मिनस मांडवी एक्सप्रेस रोहा आणि पेण स्थानकांदरम्यान थांबविण्यात येणार असून १ तास १५ मिनिटे ही ट्रेन उशिरा धावणार आहे.
- ट्रेन क्र. ५०१०६ : सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ट्रेन रोहा स्थानकात थांबविण्यात येणार असल्याने ती १ तास पाच मिनिटे उशिराने धावणार आहे.
- ट्रेन क्र. १०२०५२ : करमाळी - दादर जनशताब्दी एक्सप्रेस रोहा स्थानकात रात्री ८.४० ते ९.०५ दरम्यान नियंत्रित करण्यात असल्याने ती ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
- ट्रेन क्र. १२६१९ : मत्स्यगंधा एक्सप्रेस ९ जानेवारी रोजी जिते स्थानकात सायं. ५.०९ ते ६.५० दरम्यान थांबविण्यात येणार असल्याने ही ट्रेन १ तास ३०मिनिटे उशिराने येईल.
- ट्रेन क्र. ७१०८९ : दिवा-रोहा डिझेल पुश-पुल पॅसेंजर सकाळी ९.१० वाजरा दिव्याहून सुटेल आणि पेणपर्यंतच धावेल. नंतर रद्द.
- ट्रेन क्र. ७१०९६ : रोहा - दिवा डिझेल पॅसेंजर सायं. ४.२४ वाजता सुटेल व पेणपर्यंतच धावेल. नंतर रद्द.
- ट्रेन क्र. १६३४५ : लोकमान्य टिळक टर्मिनस - थिरुवनंतपुरम नेत्रावती सकाळी ११.४० ऐवजी दुपारी २.२० वाजता सुटेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.