पुणे : मुळशीतला कुख्यात गुंड विठ्ठल शेलारच्या पार्श्वभूमीची तपासणी करून योग्य तो निर्णय घेऊ असं आज पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी म्हटलं आहे.
ठाण्यात राज्यकार्यकारिणीच्या आधी पत्रकारांशी बोलताना बापटांनी ही माहिती दिली. विठ्ठल शेलारवर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2014मध्ये शेलारवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आणखी कोणती तपासणी बापट आणि त्यांची पार्टी विथ डिफरन्स करणार आहे असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातो आहे.