मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांबपल्ल्याच्या गाड्या थांबविल्यात

मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटे 4.45 वाजता विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा-आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवेबरोबरच लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प आहे.

Updated: Nov 26, 2016, 07:27 AM IST
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांबपल्ल्याच्या गाड्या थांबविल्यात title=

ठाणे : मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटे 4.45 वाजता विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा-आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवेबरोबरच लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प आहे.

लोकस सेवेवर परिणाम झाल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत. खडवली रेल्वे स्थानकावर लोकल तसेच मालवाहतूक गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या
दिशेकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या तसेच उपनगरिय लोकल्स विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. या मार्गावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी स्थगीत गेल्याची
 घोषणा रेल्वेकडून करण्यात येत आहे.