भंडाऱ्यात पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन चक्क पोलिसांनीच केले. ज्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तो चक्क खुनाचा आरोपी आहे. या प्रकरणी चार पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. 

Updated: Feb 8, 2017, 04:31 PM IST
भंडाऱ्यात पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन  title=

भंडारा : तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन चक्क पोलिसांनीच केले. ज्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तो चक्क खुनाचा आरोपी आहे. या प्रकरणी चार पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. 

तर पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.  30 जानेवारीला तुमसरमध्ये हेमंत उके याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी संतोष डहाट, अमन मेश्राम, कैलास साठवणे, निशिकांत राऊत, प्रशांत गाभने यांच्यासह आणखी दोघांना अटक केली होती. 

हे सगळे पोलीस कोठडीत असताना प्रशांत गाभने याचा सोमवारी वाढदिवस होता. पोलीस कोठडीत पोलिसांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.