कॅशलेसमुळे व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीटल इंडियाची घोषणा करत नोट बंदी करून सर्व व्यवहार कॅशलेस करण्याची घोषणा केली. याच घोषणेचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याच समोर आलय. कापूस विक्री नंतर व्यापा-यांनी दिलेले धनादेश वटत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट... 

Updated: May 9, 2017, 04:44 PM IST
कॅशलेसमुळे व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक  title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीटल इंडियाची घोषणा करत नोट बंदी करून सर्व व्यवहार कॅशलेस करण्याची घोषणा केली. याच घोषणेचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याच समोर आलय. कापूस विक्री नंतर व्यापा-यांनी दिलेले धनादेश वटत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट... 

औरंगाबादच्या वैजापूरमधल्या आदेश जिनिंगसमोर गेल्या 3 महिन्यांपासून हे शेतकरी घामानं पिकवलेल्या पैशांसाठी फे-या मारतायत. कारण कापूस विक्री नंतर दिलेला धनादेश न वटल्यानं या शेतक-यांची फसवणूक झालीय. हे सर्व शेतकरी जालना जिल्ह्यातील आहेत. वैजापूरमधल्या एका जिनिंगला या शेतक-यांनी आपला कापूस विकला होता. सुरुवातीला जिनिंग मधून मिळणारे धनादेश वेळेवर वटल्यानं  शेतकऱ्यांचा विश्वास बसला आणि अनेकांनी जिनिंगला कापूस दिला. मात्र  त्यानंतर एकाही शेतक-यांचा चेक वटला नाही, त्यामुळं शेतकरी चांगलेच हवालदिल झालेत.या अनेकांनी पैशांच्या जोरावर पाहिलेली स्वप्न उद्धवस्त झालीयत.

खरं तर हे शेतकरी गेली अनेक वर्ष माल विकल्यावर रोख पैसेच घ्यायचे मात्र नोटाबंदीनंतर सगळीकडेच कॅशलेस व्यवहार झाले आणि या शेतक-यांना चेकद्वारे पैसे मिळू लागले मात्र आता चेक द्वारेच त्यांची फसवणूक झालीय. आता काय करावं या विवंचनेत असलेला शेतकरी सरकालाच यासाठी दोषी ठरवतोय.

दुष्काळानं आधीच पिचलेला, त्यात पीक आलं, पण त्याचेही पैसै नाही... पेरणीची वेळ आली तरी पैसे नाही. अशात कोर्टात जाण्यावाचून आता पर्याय नाही, मात्र ज्याला जगण्याची भ्रांत आहे तो कोर्टकचेरीचा खर्च करणार तरी कसा? त्यामुळं असल्या प्रकरणाकडे प्रशासनानं, पोलिसांनीही सहानूभूतीपूर्वक लक्ष देण गरजेचं आहे.