ठाण्यात बिल्डिंग कोसळली; झोपेतच १२ जणांचा मृत्यू

ठाणे पश्चिमेला असलेल्या बी केबिन भागात इमारतील इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७ जण गंभीर जखमी झालेत.

Updated: Aug 4, 2015, 10:12 AM IST
ठाण्यात बिल्डिंग कोसळली; झोपेतच १२ जणांचा मृत्यू  title=

ठाणे : ठाणे पश्चिमेला असलेल्या बी केबिन भागात इमारतील इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७ जण गंभीर जखमी झालेत.

मंगळवारी, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. 'श्रीकृष्ण निवास' नावाची ही इमारत सुमारे पन्नास वर्षं जुनी आहे. या आधीच या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित केलं गेलं होतं. मात्र तरीही या इमारतीत पाच - सहा कुटुंबं राहत होती.

सोमवारी रात्री ही कुटुंबं झोपलेली असतानाच, ही इमारत कोसळली. तातडीनं अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगारा उपसण्याचं काम हाती घेतलं गेलं.

ढिगाऱ्यातून सात जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. तर ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरुच आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.