व्यावसायिक वादातून बिल्डरची निर्घृण हत्या

अकोल्यातील प्रख्यात प्रॉपर्टी व्यावसायिक किशोर खत्री यांची निर्घृण हत्या करण्यात आलीये. अकोला शहरालगतच्या सोमठाना गावच्या शिवारात दुपारी चार वाजता किशोर खात्री यांचा मृतदेह आढळलाय. अकोल्याच्या प्रॉपर्टी खरेदी-विक्री विश्वातलं किशोर खत्री हे मोठं नाव आहेय. दरम्यान, व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहेय. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाहीये. 

Updated: Nov 4, 2015, 04:18 PM IST
व्यावसायिक वादातून बिल्डरची निर्घृण हत्या title=

अकोला : अकोल्यातील प्रख्यात प्रॉपर्टी व्यावसायिक किशोर खत्री यांची निर्घृण हत्या करण्यात आलीये. अकोला शहरालगतच्या सोमठाना गावच्या शिवारात दुपारी चार वाजता किशोर खात्री यांचा मृतदेह आढळलाय. अकोल्याच्या प्रॉपर्टी खरेदी-विक्री विश्वातलं किशोर खत्री हे मोठं नाव आहेय. दरम्यान, व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहेय. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाहीये. 

आज दुपारी अकोल्यातील प्रख्यात प्रॉपर्टी व्यावसायिक किशोर खत्री यांचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहेय. दुपारी चार वाजताच्या सुमारास किशोर खत्री यांचा मृतदेह शहरालगतच्या सोमठाना गावच्या शिवारात आढळून आलाय. 

किशोर खत्री यांच्यावर धारदार शास्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आलीये. त्यांच्यावर एक गोळी झाडल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. मात्र, पोलिसांनी याला अद्याप दुजोरा दिला नाहीये. किशोर खत्री हे अकोल्याच्या प्रॉपर्टी खरेदी-विक्री विश्वातलं मोठं नाव आणि प्रस्थ आहेय. दुपारी चारच्या सुमारास सोमठाना गावातील शिवारात गावकऱ्यांना खत्री यांचा मृतदेह आढळून आलाय. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतलीये. 

व्यावसायिक स्पर्धेतून किशोर यांची हत्या झाल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केलीये. मात्र, यातील मारेकरी अद्याप अज्ञात असल्याने आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. किशोर खत्री यांच्या हत्येने अकोला शहरात मोठी खळबळ उडाली आहेय. 

अकोला शहरातील अनेक मोक्याच्या जागा किशोर यांच्या मालकीच्या आहेयेत. दरम्यान, किशोर खत्री यांच्या हत्या प्रकरणी एका राजकीय पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षावर संशयाची सुई आहेय. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी जिल्हाभरात शोधमोहीम सुरु केलीये. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.