रत्नागिरी : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बीएसएनलचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रभाकर पाटील याच्याभोवतीचा फास सीबीआयनं अधिक घट्ट करायला सुरवात केली आहे.
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात, प्रभाकर पाटील याच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. आपल्याच मालकीच्या जमिनीत त्यानी बीएसएनएलचे टॉवर उभारुन, त्याद्वारे बीएसएनएलकडून अव्वाच्या सव्वा भाडं वसूल केल्याचे पुढे आले आहे.
बीएसएनएलचे अतिरिक्त महासंचालक प्रभाकर पाटील यांनी याआधी सीम कार्ड घोटाळा केला आहे. पाटील यांच्यावर यापूर्वीच सिमकार्ड घोटाळ्यात ठपका ठेवण्यात आलाय. त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयनं एकाच वेळी छापा टाकला. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली. या घोटाळ्यातून पाटील यानं कोट्यवधींची माया जमा केल्याचा संशय आहे. तसेच आता बीएसएनएलकडून टॉवरपोटी जास्त भाडे उकळ्याचे आता पुढे आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.