तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण

लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.

Updated: Jul 27, 2016, 04:33 PM IST
तरुणीचं लैंगिक शोषण करणाऱ्या  तरुणाला तृप्ती देसाईंची भर चौकात मारहाण  title=

पुणे : लग्नाचं आमिष दाखवून एका मुलीची फसवणूक काढल्याप्रकरणी एका मुलाला तृप्ती देसाईंनी भर चौकात मारहाण केलीय.

पुण्याजवळच्या शिक्रापूरमध्ये ही घटना घडलीय. लग्नाचं आमिष दाखवून श्रीकांत लोंढे हा फसवणूक करत असल्याची एका मुलीची तक्रार होती. पीडित मुलीसोबत श्रीकांत लोंढे या तरुणाचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबध होते आणि तिच्याशी लग्न करणार असल्याचे त्यांनी वेळोवेळी आश्वासन दिले होते. 

या दरम्यान त्यानं तिच्यासोबत शरीर संबंधही ठेवले... इतकंच नाही तर तिला दोन वेळा गर्भपात करायलाही भाग पाडलं, असं पीडित मुलीचं म्हणणं आहे. यानंतर मात्र त्याने तिच्याशी लग्न करायला नकार दिला. 

या तक्रारीची दखल घेत तृप्ती देसाईंनी भर चौकात त्या मुलाला चोप दिला. पण ही स्टंटबाजी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. असा सगळ्यांनी कायदा हातात घ्यायचा ठरवलं, तर प्रश्न सुटणार आहेत का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेत.