पीएमपीएमएल मध्ये  ५०० - १०००च्या नोटांचा काळा बाजार?

पीएमपीएमएलच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं.  पीएमपीएमएल मध्ये  ५०० - हजारच्या नोटांचा काळा बाजार झाला आहे. प्रवाशांकडून मिळणारे सुट्टे पैसे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत भरले नाहीत. त्याऐवजी ५०० - १००० च्या नोटा भरल्या आणि सुट्टे ब्लॅक मनी असलेल्यांना दिले असा आरोप शिवसेनेनं केलाय. 

Updated: Nov 21, 2016, 08:24 PM IST
पीएमपीएमएल मध्ये  ५०० - १०००च्या नोटांचा काळा बाजार? title=

पुणे : पीएमपीएमएलच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं.  पीएमपीएमएल मध्ये  ५०० - हजारच्या नोटांचा काळा बाजार झाला आहे. प्रवाशांकडून मिळणारे सुट्टे पैसे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत भरले नाहीत. त्याऐवजी ५०० - १००० च्या नोटा भरल्या आणि सुट्टे ब्लॅक मनी असलेल्यांना दिले असा आरोप शिवसेनेनं केलाय. 

या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी शिवसेनेनं हे आंदोलन केलं. पीएमपीएमएलमधील सुट्टया पैशांचा हा घोटाळा पंधरा कोटी रुपयांचा असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. 

आंदोलनादरम्यान, पीएमपीएमएलचे अधिकारी निवेदन घेण्यासाठी आले असता शिवसैनिकांनी त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ अधिका-यांना पुन्हा कार्यालयात नेले.