भाजपला जिंकायचं पुणं....

 नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्याचीच पुनरावृत्ती भाजपला महापालिका निवडणुकीत करायची आहे. त्यातही मुंबई पाठोपाठ भाजपचं सर्वाधिक लक्ष पुण्यावर आहे. पुणे महापालिका काबीज करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची सुरवातही चांगली झाली आहे. पण, त्याला पक्षीय राजकारणाचं ग्रहण लागताना दिसतंय.

Updated: Dec 21, 2016, 10:46 PM IST
 भाजपला जिंकायचं पुणं....  title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे :  नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्याचीच पुनरावृत्ती भाजपला महापालिका निवडणुकीत करायची आहे. त्यातही मुंबई पाठोपाठ भाजपचं सर्वाधिक लक्ष पुण्यावर आहे. पुणे महापालिका काबीज करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची सुरवातही चांगली झाली आहे. पण, त्याला पक्षीय राजकारणाचं ग्रहण लागताना दिसतंय.

पुण्यातल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना महापालिका जिंकण्याचं केलेलं हे आवाहन... पुण्यात तरी त्याची सुरवात चांगली झालीय. कारण, इतर पक्षातून भाजपमध्ये नेत्यांचा ओघ सुरु झालाय. यात बहुतेक विद्यमान नगरसेवक आहेत. निवडणुकीआधीच भाजपला हे यश मिळतंय. त्यामुळं निवडणुकीतील अपयशाऐवजी पक्ष सोडणाऱ्यामुळेच इतर पक्षांना घरघर लागलीय. पण या इनकमिंगमुळे भाजपमध्येही सर्व काही आलबेल नाही. भाजपमध्येही वाद सुरू झालेत. त्याची जाहीर कबुलीच मुख्यमंत्र्यांसमोर पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा आणि त्याहीपेक्षा कोणी द्यायचा यावरून हा वाद आहे... राजसभेचे खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे भाजपमध्ये बहुतेक प्रवेश होत आहेत. भाजप प्रवेश देत असलेल्या नगरसेवकांवर आणि भाजपवरही या निमित्ताने विरोधकांनी तोंडसुख घेतलंय. भाजपकडे सक्षम कार्यकर्ते नाहीत. त्यामुळं त्यांना आयात उमेदवारांवर अवलंबून राहावं लागतंय. अशा आयात उमेदवारांना पुणेकर जागा दाखवतील अशी टीका महापौरांनीं केलीय. 

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या उमेदवारांचंही वेगळं दुखणं आहे... भाजप मधील अंतरंगात वादाचा फटका आपल्याला बसेल का... अशी भीती त्यांना वाटतेय. या वादात आपलं तिकीट कापलं जाऊ नये. नाहीतर ना घर का ना घाट का... अशी स्थिती होण्याची भीती त्यांना वाटतेय. त्यामुळे पुण्यात सध्या विविध साथी पसरल्या आहेत. पण त्या साथी आहेत राजकीय मनस्तापाच्या...