भाजपचे हिटलरप्रमाणे पाऊल - मुख्यमंत्री चव्हाण

देशात मोदींचे भाजप सरकार हिटलप्रमाणे पाऊल टाकत आहे. भाजपमध्ये ज्येष्ठांना काहीही किंमत नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

Updated: Aug 27, 2014, 09:13 AM IST
भाजपचे हिटलरप्रमाणे पाऊल - मुख्यमंत्री चव्हाण title=

कोल्हापूर : देशात मोदींचे भाजप सरकार हिटलप्रमाणे पाऊल टाकत आहे. भाजपमध्ये ज्येष्ठांना काहीही किंमत नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

कोल्हापूरमध्ये मंगळवारी काँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर तोफ डागली. अमित शाह यांच्यावर अनेक आरोप असलेल्या व्यक्तीची भाजप अध्यक्षपदी होणारी निवड दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. 

तसंच त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे मोदी सरकार हाल करत असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. देशात हिटलरप्रमाणे पाऊलं पडत आहेत. जनतेनं अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली.

दरम्यान, टोलप्रश्नी जनतेनेने कोल्हापूर बंदचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.