औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत भाजपच्या सदस्य नोंदणीची पोलखोल झाल्याचं समोर आलंय. निम्म्या सदस्यांनीसुद्धा भाजपवर विश्वास दाखवलेला नाही.
या निवडणुकीत भाजपनं २३ जागा जिंकल्या असल्या तरी भाजपच्या टार्गेटपेक्षा या जागा कमीच आहे. याचं कारण म्हणजे निवडणुकीआधी मोठा गाजावाजा करत भाजपनं सदस्यनोंदणी मोहिम राबवली. यात भाजपनं पावणे दोन लाख सदस्य नोंदणीचा दावा केला होता.
प्रत्यक्षात मात्र भाजपला ५५ हजार मतं मिळालीत. या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना भाजपनं उमेदवारांना किमान २०० सदस्य नोंदणीची अट ठेवली होती. आता निवडणुकीनंतर पावणेदोन लाख सदस्यांपैकी निम्म्या सदस्यांनीसुद्धा भाजपवर विश्वास दाखवला नसल्याचं समोर आलंय. त्यामुळं भाजपची सदस्य नोंदणी खरी होती की बोगस असा प्रश्न आता निर्माण झालाय. दरम्यान, या संदर्भात भाजप आमदार अतुल सावे यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.