गोंदिया आणि नागपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी

गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात झालेल्या 11 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल सात नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. सावनेर, खापा, कळमेश्वर, रामटेक, उमरेड या पाच नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत. तर पण मोहपामध्ये काँगेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.

Updated: Jan 9, 2017, 04:53 PM IST
गोंदिया आणि नागपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी  title=

नागपूर : गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात झालेल्या 11 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल सात नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. सावनेर, खापा, कळमेश्वर, रामटेक, उमरेड या पाच नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत. तर पण मोहपामध्ये काँगेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.

काटोल आणि नरखेडमध्ये भाजपला मोठा हादरा बसलाय. भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या मतदार संघातल्या या दोन्ही नगरपालिकामध्ये भाजपला पराभवाचं तोंड बघावं लागतंय. नरखेडमध्ये भाजपचा एकही नगरसेवक निव़डून आलेला नाही. तिथे नगरविकास आघाडीचे अभिजीत गुप्ता नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर कोटोलमध्ये चरणसिंह ठाकूर यांच्या विदर्भ माझा या पक्षाच्या वैशाली ठाकूर नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.