काँग्रेसच्या ३५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग, भाजपची सरशी

काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसची गेल्या ३५ वर्षातील सत्ता उलथवून पहिल्यांदाच भाजपने सत्ता मिळविली. 

Updated: Mar 21, 2017, 07:45 PM IST
काँग्रेसच्या ३५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग, भाजपची सरशी  title=

लातूर : काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसची गेल्या ३५ वर्षातील सत्ता उलथवून पहिल्यांदाच भाजपने सत्ता मिळविली. 

राज्याचे कामगारमंत्री तसंच लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हे बहुमत मिळविले. एकूण ५८ जागांपैकी ३६ जागां पटकावीत भाजपने लातूर जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळविले. 

अपक्ष महिला उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपचा आकडा हा ३७ वर गेला होता. त्यामुळे औपचारिकता बाकी असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आपले उमेदवारही उभे केले नाहीत. 

त्यामुळे सर्वानुमते निवड झालेल्या मिलिंद लातूरे यांची अध्यक्षपदी तरी उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांची बिनविरोध निवड झाली. लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष काम करतील असे यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.