नको भानामती... नको बारामती.... शहराची सत्ता राम-लक्ष्मणाच्या हाती

पिंपरी चिंचवड च्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी भ्रष्टाचार हाच मुद्दा करायचा असं भाजपने ठरवले होते. पण त्याचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्याने आता भाजपने पिंपरी चिंचवड करांच्या अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न सुरु केलाय...

Updated: Dec 30, 2016, 09:55 PM IST
 नको भानामती... नको बारामती.... शहराची सत्ता राम-लक्ष्मणाच्या हाती title=

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड च्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी भ्रष्टाचार हाच मुद्दा करायचा असं भाजपने ठरवले होते. पण त्याचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्याने आता भाजपने पिंपरी चिंचवड करांच्या अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न सुरु केलाय...

नको भानामती... नको बारामती.... शहराची सत्ता देऊ आपल्या राम लक्ष्मणाच्या हाती....! 

बारामती पुणे १०६ किलोमीटर, आहो साहेब आणि दादा १०० किलोमीटर हुन काही दिसत नाही, आता बारामती कर नाही तर पिंपरी चिंचवड कर करणार शहराचा विकास....!

ही भावनिक साद आता भाजप कडून घातली जात आहे. अजित पवार हे पिंपरी चिंचवड चे नाहीत आणि भाजपचे नेतृत्व पिंपरी चिंचवडचे आहे हे अधोरेखित करण्यासाठी भाजपच्या सोशल मीडिया सेल कडून ही जाहिराबाजी सुरु झालीय...! त्याला भाजपकडून तर्क ही दिला जातोय...!

दुसरीकडं भाजपच्या या प्रचारामुळं संतापलेल्या राष्ट्रवादीने जोरदार प्रतिहल्ला केलाय. जे स्थानिक नेते अजित पवारांवर टीका करतात त्यांना अजित पवार यांनीच मोठे केलंय हे तरी विसरू नका असा पलटवार राष्ट्रवादीने केलाय. अजित पवारांचे बारामती एवढेच प्रेम पिंपरी चिंचवड वर आहे असा युक्तिवाद ही राष्ट्रवादीने केलाय... 

मुळात राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी भाजपने भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला होता. पण त्याला अपेक्षित यश मिळत नसल्याने आत भाजपने अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न केलाय. पण अजित पवारांवर प्रेम करणारा मोठा वर्ग शहरात आहे, त्यामुळं भाजप चे भावनिक आव्हान कितपत टिकते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे...!