नागपूर : दिल्ली विधानसभा निवडणूक सपाटून मार खाल्लेल्या भाजपला बिहार विधानसभा निवणुकीतही पराभवाला चांगले सामोरे जावे लागले. एकहाती सत्ता मागणाऱ्या भाजपला केवळ ५३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजपच्या पराभवाचा खल देशात सुरु आहे. त्याचबरोबर पक्षांतर्गत जोरदार कुरबुरी सुरु झाल्यात. त्यावर पराभव हा सगळ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींनी दिलेय.
भाजपमधील नाराज ज्येष्ठ नेत्यांनी एक बैठक घेतली. याबैठकीनंतर एक प्रसिद्ध पत्रक काढण्यात आले. यात मोदी आणि अमित शाह यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारावी, असे म्हटले. बिहार पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शाह यांनाच जबाबदार धरणे योग्य नाही. बिहारमधील पराभवामुळे अमित शाह यांचे अध्यक्षपद धोक्यात आल्याच्या वृत्ताचेही गडकरी यांनी खंडन केलेय.
आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, एखाद्या कुटुंबाचा नाही. एखादा विजय किंवा पराभव ही सर्वांची जबाबदारी असते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखालीदेखील पराभव स्वीकारावा लागला आहे. बिहारमध्ये पराभूत झालो. त्याला अनेक कारणे आहेत. तीन विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्याच्या गणिती आकडेमोडीचा परिणाम झाला. भाजपने पक्ष म्हणून आतापर्यंत अनेक विजय आणि पराभव पाहिले आहेत. हा पक्ष कधीच कुण्या एका व्यक्तीचा नव्हता आणि नाही, असे गडकरी म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.