खाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू

जिल्ह्यात खेड येथे दिवाळीला गालबोट लागले आहे. खाऊ समजून फटाके खल्ल्याने एका चिमुरडीचा मृत्यू झाला.

Updated: Nov 11, 2015, 04:14 PM IST
खाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू title=

 रत्नागिरी : जिल्ह्यात खेड येथे दिवाळीला गालबोट लागले आहे. खाऊ समजून फटाके खाल्ल्याने एका चिमुरडीचा मृत्यू झाला. अंगणात उन्हामध्ये ठेवलेल्या फटाक्‍याचे पाकीटातील फटाका खाऊ समजून चघळल्याने दारू पोटात जाऊन चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. खेड तालुक्यातील तिसंगी गावात ही घटना घडली.

खाऊ समजून दामिनी संदीप निकम हिने फटाके तोंडात टाकलेत. फटाक्यातील विषारी दारूमुळे फटाके तिच्या जीवावर बेतलेत. दामिनी घरासमोरील अंगणात खेळत असताना खाण्याची वस्तू समजून तिने फटाक्‍याचे पाकीट फोडले आणि त्यातील फटाका तोंडात टाकला. फटाक्‍यातील दारू पोटात गेल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या पालकांनी तिला तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक झाली.

त्यानंतर दामिनीला तात्काळ कळंबणी आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने तिसंगी गावात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.