चेन्नईत मराठमोळा अधिकारी ठरला 'हिरो'

चेन्नईमध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर चर्चा सुरू आहे ती एका मराठमोळ्या व्यक्तीची. विजय पिंगळे यांची सध्या चैन्नईत त्यांनी केलेल्या भाकितामुळे चर्चा सुरू झाली आहे.

Updated: Dec 9, 2015, 10:24 PM IST
चेन्नईत मराठमोळा अधिकारी ठरला 'हिरो' title=

चेन्नई : चेन्नईमध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर चर्चा सुरू आहे ती एका मराठमोळ्या व्यक्तीची. विजय पिंगळे यांची सध्या चैन्नईत त्यांनी केलेल्या भाकितामुळे चर्चा सुरू झाली आहे.

चेन्नईवर आलेल्या संकटाबाबतचं २ वर्षांपूर्वी विजय पिंगळे याच मराठमोळ्या आयएएस अधिकाऱ्यानं भाकित केलं होतं. त्यादृष्टीनं शहरच्या बचावासाठी त्यांनी धडाकेबाज मोहिमा राबवल्या. पण काही बड्या व्यक्तींचे हितसंबंधं आडवे आले आणि चैन्नई आज पाण्यात आहे.

पाहा व्हिडिओ...

चेन्नईत सध्या 'पिंगळे ब्रिंग बॅक'चे फलक जागो जागी लागलेत. चैन्नईत एका दिवसात १० सेमी पेक्षा जास्त पाऊस झाला तर हाहाकार माजेल... हे भाकित पिंगळेंनी वर्तवलं होतं. पण त्यांचं चैन्नईच्या सेवेत असणं कित्येकांना खटकलं आणि सव्वा वर्षात त्यांची बदली केली. पिंगळेंची बदली केली म्हणूनच शहर पाण्यात गेलं अशी चर्चा सोशल मीडियात आता सुरू झाली आहे. 

विजय पिंगळे हे मुळचे नाशिकमधील येवला येथील राहणारे. एमबीबीएस पूर्ण केल. पण समाजसेवेच्या आवडीपोटी युपीएससीचा मार्ग त्यांनी चोखाळला. २००४ च्या बॅचचे ते आएएस. गेल्या ११ वर्षांपासून तामिळनाडू केडरमध्ये सेवा बजावतायत.  खरंतर अशा अधिकाऱ्यांची संपूर्ण देशालाच गरज आहे. त्यामुळं या अधिकाऱ्यांपुढे कुठल्याही बड्या व्यक्तींचे हितसंबंध आड येऊ नयेत, तरच एखाद्या शहराचं नाही तर देशाचंही भलं होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.