www.24taas.com, झी मीडिया, आशिष आंबाडे, चंद्रपूर
एसटी स्थानक अथवा बसमध्ये तान्हुल्याला दूध पाजायला मातांना खूप ओशाळल्यासारखे वाटते. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाने ‘हिरकणी कक्ष’ची सोय केली आहे. चंद्रपूर येथे हा पहिला प्रयोग करण्यात आला असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मातांची होणारी अडचण लक्षात घेता महामंडळाने स्वतंत्र कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याला ‘हिरकणी कक्ष’ असे नाव देण्यात आले आहे. हा कक्ष आठ बाय दहाचा असून कक्ष ओळखता यावा यासाठी कक्षाबाहेर माता आणि लहान बाळाचा फोटो लावण्यात येणार आहे. तसेच माता आणि तिच्या लहान बाळाव्यतिरीक्त या कक्षात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
एसटी महामंडळाने दोन महिन्यापूर्वी निमआराम बसेसना ‘हिरकणी’ नाव देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आतापर्यंत 1,500 बसेसना हिरकणी नाव देण्यात आले आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.