सांगलीत दलितांवर अन्याय, पाण्यासाठी बहिष्कार

जिल्ह्याच्या खिरवडे गावातलय्या दलितांवर 'पिण्याच्या पाण्या'साठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार इतका गंभीर बनलाय की पाण्यासाठी आत्महत्या करण्याचा इशारा या बांधवांनी दिला आहे.

Updated: Apr 14, 2015, 04:26 PM IST
सांगलीत दलितांवर अन्याय, पाण्यासाठी बहिष्कार title=

सांगली : जिल्ह्याच्या खिरवडे गावातलय्या दलितांवर 'पिण्याच्या पाण्या'साठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार इतका गंभीर बनलाय की पाण्यासाठी आत्महत्या करण्याचा इशारा या बांधवांनी दिला आहे.

पिण्यासाठी बोअरचं गढूळ पाणी.गावात विहीर असूनही २७ वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. ही व्यथा आहे सांगली जिल्ह्यातल्या खिरवडे गावातल्या दलितांची. दोन हजार दोनशे लोकसंख्या असलेल्या या गावात अडीचशे जणांची दलित वस्ती आहे.

या लोकांसाठी गेल्या वर्षी राष्ट्रीय पेय योजनेअंतर्गत विशेष घटक पाणीयोजना मंजूर करण्यात आली. डोंगर पायथ्याला असलेल्या तलावातून विहीरीत येणारे पाणी टाकीद्वारे या वस्तीसाठी देण्याची ही योजना. मात्र योजनेचे काम करण्यास येणा-या लोकांना तथाकथित अपप्रवृत्ती विरोध करत असल्याचा आरोप या दलित बांधवांनी केलाय. 

गावात जातीभेद नसून दलित वस्तीसाठी असणा-या पाणीयोजनेला विरोध असणारच असं प्रमोद पाटील नावाच्या ग्रामस्थानं म्हटलंय. सरीकडे ही पाणीयोजना कोणताही बदल न करता पूर्ण करण्याचं आश्वासन पाणी पुरवठा विभाग देतंय.

याच पाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा संघर्ष केला. मात्र आजही याच पाण्यासाठी २७ वर्ष संघर्ष करावा लागणं ही मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.