प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षात आता 'विशेष स्मार्ट कार्ड'

स्वप्नाली लाड प्रकरणातून धडा घेतलेल्या ठाणे वाहतूक पोलिसांना उशीरा का होईना जाग आलीय. ठाण्यातल्या रिक्षाचालकांसाठी विशेष स्मार्ट आयडी योजना सुरु करण्यात आलीय. यावेळी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिदेखील यावेळी उपस्थित होती.

Updated: Sep 19, 2014, 01:00 PM IST
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षात आता 'विशेष स्मार्ट कार्ड' title=

ठाणे : स्वप्नाली लाड प्रकरणातून धडा घेतलेल्या ठाणे वाहतूक पोलिसांना उशीरा का होईना जाग आलीय. ठाण्यातल्या रिक्षाचालकांसाठी विशेष स्मार्ट आयडी योजना सुरु करण्यात आलीय. यावेळी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिदेखील यावेळी उपस्थित होती.

रिक्षामध्ये प्रवाशाच्या सीटसमोर रिक्षा चालवणाऱ्या चालकाची माहिती लावण्यात आलीय. इथं त्या रिक्षाचालकाचं नाव तर आहेच. शिवाय इतर काही गोष्टीही इथं नमूद केल्याचं दिसतंय. पिवळ्या रंगाचं हे आहे विशेष स्मार्ट आयडी... 

ठाणे वाहतूक पोलिसांनी ही नवी योजना सुरु केलीय. यानुसार ठाण्यातल्या ५००० रिक्षाचालकांना हे कार्ड देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या स्वप्नाली लाड प्रकरणातून धडा घेत ही योजना सुरु करण्यात आलीय.  याच कार्डावर तक्रार करण्यासाठीचा नंबरही देण्यात आलाय. त्यामुळं भाडं नाकारणं, मुजोरी दाखवणं, प्रवाशांची फसवणूक अशा प्रकारांनाही आळा बसणार असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यासाठी ठाणेकरांनी हे कार्ड असलेल्या रिक्षातूनच प्रवास करावा, असं आवाहन डीसीपी (वाहतूक पोलीस) रश्मी करंदीकर यांनी केलंय.  
  
या योजनेचं स्वागत होत असलं तरी ठाण्यात रिक्षाचालकांच्या मुजोरीवर वाहतूक पोलिसांना नियंत्रण मिळवता आलेलं नाही. त्यातच जवळपास साडे बारा हजारांपैकी फक्त पाच हजार रिक्षांना हे स्मार्ट आयडी देण्यात येणार आहेत. त्यामुळं इतर रिक्षांचं काय असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.