धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पत्रकार अमोल राजपूत या तरुण पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.
राजपूत यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी बोरगाव इथल्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गावातील उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याने पत्रकारांमध्ये रोष आहे.
पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध केलाय. गावातील गैरव्यवहारांच्या बातम्या का छापल्या? या रागातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय.