कोल्हापूर : कम्युनिष्ट नेते आणि कामगार नेते गोविंद पानसरे यांनी कोल्हापुरातील टोलविरोधात आंदोलन प्रमुख भूमिका बजावलेय. दोन दिवसांपूर्वी लोकशाही मार्गाने मॉर्निग वॉकचे आयोजन केले होते. राजकीय नेत्यांसह हजारो नागरिक या महापदयात्रेत सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले होते. आज त्यांच्या पक्षाची सभा होणार होती. त्यात ते मार्गदर्शन करणार होते. त्याआधीच त्यांचा गोळीबार करुन गेम करण्यात आला.हा हल्ला झाल्याने विविध तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर मास्क लावलेल्या दोन अज्ञात व्यक्तींकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. सकाळी त्यांच्या दिशेने हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात पानसरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. तेथील नागरिकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात हलविले. त्यांची स्थिती गंभीर आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूरसह राज्यातील राजकीय नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार राजू शेट्टी, कम्युनिष्ठ नेत भालचंद्र कांगो, अनिसच्या मुक्ता दाभोळकर, सामाजिक नेत्या मेधा पाटकर, विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी तीव्र शब्दात या भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय.
सकाळी पावणेदहाच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात लोकांनी पानसरे यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या पत्नी गेल्यावर त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यानंतर पानसरे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची पत्नही गंभीर जखमी झाली होती. या नंतर त्यांचे नातेवाईक तिथे आले आणि त्यांनी मोटारीतून त्यांना नजीकच्या अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल केले.
पानसरे यांच्या पक्षाची आज कोल्हापूरमध्ये प्रचारसभा होती. सकाळी ११ वाजता ही सभा होणार होती. त्यापूर्वीच हा हल्ला झाल्याने विविध तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी कोल्हापूरमध्ये नाकाबंदी केली आहे. पानसरे यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला असून, त्यांना तातडीने हल्लेखोरांचा शोध घेण्याची सूचना केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.