कोल्हापूर: कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या लाचखोर माहापौर तृप्ती माळवी या महापौर पद सोडायला तयार नाहीत. आज होणाऱ्या महासभेमध्ये त्या गैरहजर राहणार आहेत.
वास्तविक पहाता आजची महासभा ही महापौरांनी राजनामा द्यावी यासाठीच बोलावण्यात आली होती. मात्र आजाराचं कारण देत महापौर तृप्ती माळवी यांनी कोल्हापूर महानगरपालीकेचेआयुक्त पी.शिवशंकर यांना रजेचं पत्र पाठवून दिलंय. त्यामुळं आजच्या सभेत सुद्धा महापौर राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट आहे.
कोल्हापूर महानगरपालीकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार महापौर तृप्ती माळवी यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत, मात्र माळवी त्यांना कोणत्याही प्रकार सहकार्य करायला तयार नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.