...म्हणून शाळाच दुसरीकडे हलवली, आदिवासी विभागाचा अजब दावा

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना साप चावला म्हणून शाळेची जागा बदलली, असा अजब युक्तीवाद आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात केलाय. 

Updated: May 5, 2017, 12:37 PM IST
...म्हणून शाळाच दुसरीकडे हलवली, आदिवासी विभागाचा अजब दावा title=
फाईल फोटो

पालघर : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना साप चावला म्हणून शाळेची जागा बदलली, असा अजब युक्तीवाद आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात केलाय. 

पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांना साप चावला होता. त्यामुळे शाळेची जागा बदलावी लागली, असं मनीषा वर्मा यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर साप चावणं ही नैसर्गिक आपत्ती असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यामुळे आपल्या विभागाला नाईलाजानेच आश्रमशाळेची जागा बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं म्हणत आपल्या विभागाच्या निर्णायाचा बचावही त्यांनी केलाय.

यावर, आहे त्या जागी शाळा उभी करणार का? असा सवाल राज्य सरकारला विचारत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. इतकंच नाही तर, आत्तापर्यंत आम्हाला भूकंप, पूर, चक्रीवादळं या गोष्टीच नैसर्गिक आपत्ती वाटायच्या, असा सणसणीत टोलाही हायकोर्टानं सरकारला लगावलाय. 

२००९ साली पालघर जिल्ह्यातील मेढवण गावातील आश्रमशाळा नुतनीकरणाच्या नावाखाली बंद करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात तेथील ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. शाळा दूर गेल्यानं अनेकांनी आपले शिक्षण सोडून दिलाचं याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं.