'राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे ढिले झाले'

निवडणुका आल्या की सगळेच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचं काम करीत असतात.

Updated: Feb 11, 2017, 10:49 PM IST
'राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे ढिले झाले' title=

परभणी : निवडणुका आल्या की सगळेच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचं काम करीत असतात. अशी स्थिती राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर दिसून येत आहे. परभणी जिल्ह्यातील नरवाडी येथील सभेत अशोक चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे आता ढीले झालेत, त्यांना मतदान करून आता काय फायदा असा खोचक सवाल मतदारांना केला.

तर नेहमी आक्रमक असणाऱ्या अजित पवारांनी मात्र सौम्याची भाषा घेत कुणी काय बोलावं हे ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. निवडणुका पार पडल्या नंतरच कोणाचे काटे बंद पडले ते चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.