अरुण गवळीच्या चुकीला पुन्हा माफी, न्यायालयाकडून पॅरोल मंजूर

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पॅरोल द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत.

Updated: Oct 17, 2016, 04:49 PM IST
अरुण गवळीच्या चुकीला पुन्हा माफी, न्यायालयाकडून पॅरोल मंजूर title=

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पॅरोल द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. 21 ऑक्टोबरला अरुण गवळीला पॅरोलवर सोडावं आणि त्यानं 2 नोव्हेंबरला परत यावं असा आदेश न्यायालयानं दिला आहे.

पत्नीच्या आजारपणामुळे अरुण गवळीनं पॅरोलसाठी अर्ज केला होता. अरुण गवळीच्या पत्नीचं 25 ऑक्टोबरला ऑपरेशन आहे.