अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकआंदोलनाच्या रेट्यानंतर संसदेत कायदा मंजूर होऊनही लोकपाल आणि लोकायुक्त देशात कुठेही नियुक्त होणार नसतील, तर ही जनतेच्या भावनांशी सरकारनं केलेली प्रतारणा असल्याचा आरोप, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केलाय.

Updated: Mar 29, 2017, 04:29 PM IST
अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात  title=

राळेगणसिद्धी : लोकआंदोलनाच्या रेट्यानंतर संसदेत कायदा मंजूर होऊनही लोकपाल आणि लोकायुक्त देशात कुठेही नियुक्त होणार नसतील, तर ही जनतेच्या भावनांशी सरकारनं केलेली प्रतारणा असल्याचा आरोप, ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा आपण रामलीलावर आंदोलन करणार असल्याचे संकेत अण्णा हजारेंनी दिलेत.

राळेगणसिद्धी इथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र पाठवलं असून, पुढलं पत्र हे पंतप्रधानांना यासंबंधीचं शेवटचं पत्र असेल आणि त्यामध्ये आंदोलनाच्या तारखेचा स्पष्ट उल्लेख असेल, असंही अण्णा हजारेंनी यावेळी सांगितलं. दरम्यान आपण दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलन करावं किंवा नाही याबाबत जनतेनं फेसबुकवरुन कळवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.