तुकोबांची पालखी रोटी घाटात तर माऊलींची वाल्ह्यात

जेजुरीतील मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हे गावाकडे मार्गस्थ झालीय. माऊलींचा आजचा मुक्काम हा वाल्ह्यात असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्यात. तसंच पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गुढ्याही उभारण्यात आल्यात. 

Updated: Jul 15, 2015, 03:11 PM IST
तुकोबांची पालखी रोटी घाटात तर माऊलींची वाल्ह्यात title=

पुणे : जेजुरीतील मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हे गावाकडे मार्गस्थ झालीय. माऊलींचा आजचा मुक्काम हा वाल्ह्यात असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्यात. तसंच पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गुढ्याही उभारण्यात आल्यात. 

तर, वरवंडहून निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम गवळ्याची उंडवडी इथं असणार आहे. 

दरम्यान, तुकाराम महाराजांच्या पालखी रोटी घाटात दाखल झालीय. रोटी घाटाचा हा टप्पा वारकरी तुकोबारायांच्या गजरात पार करतात. चढणीसाठी अतिशय त्रासदायक असा हा घाट, पालखीसाठी अतिशय सुकर बनतो आणि याला कारण म्हणजे या घाटमार्गासाठी रोटीतल्या खास सहा बैलजोड्या जोडल्या जातात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.