अजितदादांचा सिंघम अवतार, म्हटले आता माझी सटकली

  राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सटकली आणि त्यांना राग येतोय... अहो हे आम्ही नाही म्हणत स्वतः दादा कोल्हापूरच्या भाषणात म्हणत होते. 

Updated: Sep 16, 2014, 09:09 PM IST
अजितदादांचा सिंघम अवतार, म्हटले आता माझी सटकली title=

कोल्हापूर :   राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सटकली आणि त्यांना राग येतोय... अहो हे आम्ही नाही म्हणत स्वतः दादा कोल्हापूरच्या भाषणात म्हणत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसने आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी विविध मान्यवरांचे भाषण झाली. त्यावेळी अजित पवार यांनी सिंघम चित्रपटातील बाजीराव सिंघमचा डायलॉग मारला आणि उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी फुलली. या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार, हसन मुश्रीफ आणि आर. आर. पाटील खळखळून हसत होते. 

भाषण सुरू असताना अजित पवार भाजप शिवसेनेचा समाचार घेत होते. ते म्हणाले, मी आर. आर. पाटील यांचे भाषण बारकाईने ऐकत होतो. त्याला जनतेचा प्रतिसादही मी पाहिला. तासगावची जनता मोठ्या संख्येने आलेली दिसते. आर. आर. पाटील यांचे भाषण ऐकून आता माझी सटकली. आता माझी सटकली आणि जनतेला राग येतो... हो आता माझी सटकली आता माझी सटकली... 

 

पाहा काय म्हणाले अजितदादा (व्हिडिओ) 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.