अजित पवारांनी यासाठी मारली मराठा मोर्चाला दांडी?

बारामतीसह पुणे जिल्ह्यातल्या 10 नगरपालिकांमध्ये आज मतदान होतं. यात पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 14, 2016, 06:16 PM IST
अजित पवारांनी यासाठी मारली मराठा मोर्चाला दांडी? title=

पुणे  : राज्यातले अनेक बडे नेते नागपूरच्या मराठा मोर्चात सहभागी झाले असले तरी राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या मोर्चाला दांडी मारली. बारामतीसह पुणे जिल्ह्यातल्या 10 नगरपालिकांमध्ये आज मतदान होतं. यात पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

भाजपाचे गिरीश बापट जिल्ह्यात तळ ठोकून बसले आहेत. नगर पालिकांच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका बसलाय. त्यामुळे पक्षाचे नेते जास्त सावध झाले आहेत. बालेकिल्ल्यामध्ये फटका बसू नये, यासाठी पवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.