महापालिकेच डोके ठिकाणावर आहे का...?

 ज्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी दिली नाही त्यामुळं नागरिकांना उठा बशा काढायची शिक्षा दिली आणि त्यांच्या या प्रतापान पिंपरी चिंचवडच नावं अख्या महाराष्ट्रात बदनाम झालं, त्याच भोसरीतल्या गणेशोत्सव मंडळाला पारितोषिक देण्याचा दानशूरपणा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलाय. एवढंच नाही तर मंडळाच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या अजित पवार यांच्या हस्तेचं तो पुरस्कार दिला जाणार असल्याने पालिकेचं डोके ठिकाणावर आहे का असं म्हणण्याची वेळ आलीय....! 

Updated: Dec 6, 2016, 09:24 PM IST
महापालिकेच डोके ठिकाणावर आहे का...?  title=

कैलास पुरी , झी मीडिया,पिंपरी :  ज्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी दिली नाही त्यामुळं नागरिकांना उठा बशा काढायची शिक्षा दिली आणि त्यांच्या या प्रतापान पिंपरी चिंचवडच नावं अख्या महाराष्ट्रात बदनाम झालं, त्याच भोसरीतल्या गणेशोत्सव मंडळाला पारितोषिक देण्याचा दानशूरपणा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलाय. एवढंच नाही तर मंडळाच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या अजित पवार यांच्या हस्तेचं तो पुरस्कार दिला जाणार असल्याने पालिकेचं डोके ठिकाणावर आहे का असं म्हणण्याची वेळ आलीय....! 

भोसरी मधल्या एका बेकरी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी दिली नाही आणि श्रीराम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यांना चक्क उठाबशा काढायला लावल्या...या धक्कादायक प्रकारानं मंडळाचं नाही तर संपूर्ण शहराचं नावं राज्यभरात बदनाम झालं. मंडळाचा हा प्रताप प्रसार माध्यमांनी चव्हाट्यावर आणला. शहरात घडलेल्या या प्रकारामुळं शहराचे सर्वे सर्वा अजित पवार यांनी ही नाराजी व्यक्त केली..

मंडळाचा हा प्रताप चव्हाट्यावर आणणाऱ्या प्रसार माध्यमांनाच श्रीराम मित्र मंडळानं टार्गेट केलं. मंडळानं चक्क प्रसार माध्यमांचे डोके ठिकाणावर आह का हा देखावा सादर केला..प्रसार माध्यमे कशी एकांगी बातम्या देतात असा त्याचा सूर होता. चुकीच्या कामामुळं महापालिकेला ही टार्गेट करणाऱ्या प्रसार माध्यमांवर सादर केलेला हा देखावा महापालिकेला ही एवढा समाज प्रभोधन करणारा वाटला आणि त्यांना समाजप्रभोधन गटातून महापालिकेनं द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी मंडळावर संताप व्यक्त केलं असताना त्यांच्याच हस्ते बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा पालिकेनं केली 

आता महापालिकेने जाहीर केलेला हा पुरस्कार कोणत्या निकषांवर दिला गेला हे पालिकेलाचं माहित... पण पुरस्करने महापालिकेच्या हेतू बद्दल मात्र शंका निर्माण झालीय हे खरे...!