नाशिक : नाशिक विमानतळावरील दारू पार्टीप्रकरणी विलास बिरारी या बिल्डरला अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय.
बिरारी हे हर्ष कंस्ट्रक्शनचे संचालक आहेत. बिरारींनाच विमानतळ बांधकामाचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळंच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रभाकर देशमुख यांना निवृत्तीच्या पार्टीचं बक्षिस दिल्याची चर्चा यामुळं रंगलीय.
बिरारींपूर्वीच दारू पार्टी प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. मात्र या दोघांना जामीन देण्यात आला होता. मात्र हे सर्व पडद्याआड झाल्याचं बोललं जातंय. तर वादग्रस्त दारूपार्टी प्रकरणी प्रभाकर देशमुखांची एसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेनं याची गंभीर दखल घेतली असून सुरक्षा विषयक अहवाल संरक्षण खात्याला पाठवण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.