वसई : येथील आगाशी गावातल्या एका कुटुंबाने समाजासमोर खणखणीत आदर्श ठेवलाय. एकत्र कुटुंबातल्या ८० जणांनी देहदान करण्याचा निर्णय घेतलाय. देहदान चळवळीला बळ देणा-या कुटुंबाचीही आदर्श कथा.
(व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)
वसईजवळ असलेलं आगाशी हे निसर्ग सुंदर गाव. या गावात लोपीस परिवाराचा मोठा विस्तार आहे. सुशिक्षीत, सुसंस्कृत कुटुंब अशी त्यांची ओळख... पंचक्रोशीत या कुटुंबातल्या आजोबांचा मोठा नावलौकीक होता. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या या कुटुंबाने एक नवा आदर्श निर्माण केलाय. आजोबा बसत्याव लोपीस यांच्या २५ व्या स्मृतीनिमित्त संपूर्ण ८० जणांच्या कुटुंबाने देहदान, अवयवदान आणि नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. या कुटुंबातल्या ८०जणांनी ही नोंदणी प्रक्रिया सुरूही केली आहे.
नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच काही बरेवाईट घडले तरी रजिस्ट्रेशन क्रमांक, इतर तांत्रिक बाबीत अडकून न पडता आमची इच्छा पूर्ण करा असं लोपीस कुटुंबीय सांगतात. लालफितीचा कारभार, देहदानासंबंधी समाजात असलेली अनभिज्ञता आणि अनास्था हा या चळवळीतला मोठा अडथळा समजला जातो. लोपीस कुटुंबीयांनी या चळवळीत खरोखर एक मैलाचा दगड निर्माण केलाय यात शंकाच नाही.